पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात मान्सुनच्या पावसाने (Monsoon rains) जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. कोकणात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूनचा जोर कायम असून मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प (Railway service disrupted) झाली आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरील (Mumbai-Pune Trains) खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यातील काही दरडी थेट मुंबई-पुणे लोहमार्गावर (Mumbai-Pune Trains) कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरुच
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु पावसाचा जोर कायम असल्याने दरडी हटवण्याच्या कामात अडथळा येत आहे. त्यातच घाट परिसरात सध्या जोरदार वारे वाहत असून दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
#SatarkAlert #Landslides
२२ जुलै: घाटमाथ्यावरील अतिवृष्टीमुळे खंडाळा घाटात मुंबई- पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मुंबई- पुणे रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. @RailMinIndia @Central_Railway @CMOMaharashtra @5Ndrf @VijayWadettiwar pic.twitter.com/id3Ac7HkQw— satark (@satarkindia) July 22, 2021
महामार्गावरुन प्रवास करण्याचे आवाहन
रेल्वे मार्गावर पडलेल्या दरडी हटवण्याचे काम सुरु आहे. परंतु पावसाची स्थिती आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण याचा विचार करुनच रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे रेल्वे प्रशासनातील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गरज असेल तर घराबाहेर पडा अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Web Title :-Mumbai-Pune Trains | mumbai pune trains service stopped due to heavy rains
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Bakrid | बकरी ईदला जनावरांच्या कुर्बानीविरोधात मुस्लिम तरूणानं उघडला ‘मोर्चा’, 72 तासाचा केला ‘रोजा’