रायगड : बहुजननामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे. बस बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या चालकाचा यात जागीच मृत्यू झाला आहे. ही खाजगी बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना, बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघातात चालक जागीच ठार झाला असून,
तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या अपघातानंतर देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणा,
महामार्ग वाहतूक पोलीस आणि खोपोली पोलीस घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai-Pune Expressway Accident)
Web Title :- Mumbai-Pune Expressway Accident | accident private bus and container on mumbai pune expressway bus driver was killed on spot raigad khopoli
हे देखील वाचा :
Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे
Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार