मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- दिल्लीमध्ये वकील विरुद्ध पोलीस यांच्यातील मारहाण प्रकरण ताजे असतानाच मुंबई पोलिसांवर देखील हल्लाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला कसेबसे पोलिसांनी गाडीत टाकले. पोलीस व्हॅनमध्ये देखील या तरुणाने गोंधळ करत पोलिसांना शिव्या घेतल्या. एवढेच नव्हे तर शिव्या घालताना सहाय्यक फौजदाराच्या हाताचा जोराचा चावा घेतला. ही कुर्ल्यातून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. मिर्झा आलम अजीम असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेत एक पोलीस जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कुर्ला परिसरात मिर्झा दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. तेथील नागरिकांनाही तो शिवीगाळ करत होता. रात्री उशिरा ११ वाजता पोलिसाना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर लगेच पोलीस काशिनाथ पुकळे (५७) हे काही पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांने पोलिसांनादेखील धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मिर्झाला पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने काशिनाथ यांच्या हाताचा चावा घेतला.
मिर्झा हा कुर्ला येथील रहिवासी असून तो हातगाडी चालविण्याचे का करतो. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर धारावीतही अशीच एक घटना समोर आली आहे. धारावी मेन रोड परिसरात वाढदिवसाचा डीजे बंद करण्यास सांगितल्याने ज्ञानेश्वर घोरपडे यांना मारहाण करण्यात आली. त्यांनाही उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com