मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Police | मुंबईमध्ये एका नवजात (Newborn Baby) बाळाला वाचवण्याची अनोखी घटना समोर आली आहे. येथील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यातून वाहून चालले होते. त्यास प्रथम मांजरांनी (Cats) पाहिले आणि त्यांनी आपल्या ‘म्याव-म्याव’ आवाजाने आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केले. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी जाऊन नवजात बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या घटनेबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, नवजात बाळ कपड्यात गुंडाळले होते. त्यास पाहून मांजरींनी ओरडण्यास सुरूवात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष या नवजात बाळाकडे वेधून घेतले. लोकांनी नवजात बाळ पाहून ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांचे निर्भया स्क्वाड ताबडतोब घटनास्थळी आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस पथकाने बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि त्यास राजावाडी हॉस्पिटलमध्ये (Rajawadi Hospital) नेण्यात आले.
तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नवजात बाळ धोक्याच्या बाहेर आहे आणि ठीक आहे.
पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बाळाचा फोटोही शेयर केला आहे.
Web Title :- Mumbai Police | mumbai police saved newborn from drain after cats alert residents.
Gold Silver Price Today | सोने पोहचले 50 हजार रुपयांच्या जवळ, जाणून घ्या चांदीत आज किती आली तेजी?
EPFO-PPO | ‘हा’ नंबर पेन्शनर्ससाठी अतिशय महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या