मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका ५८ वर्षीय डॉक्टराने उपचारासाठी आलेल्या २७ वर्षीय महिला रुग्णावर बलात्कार केलाची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी बलात्काराचा आरोपाखाली या डॉक्टरला अटक केली आहे. एवढेच नव्हे तर आरोपी डॉक्टरने महिला रूग्णाचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून प्रसिद्ध केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Mumbai Police: Mumbai Police: A 58-year-old doctor arrested for allegedly raping, blackmailing, and circulating an objectionable video of a 27-year-old female patient. Case registered, further investigation underway. pic.twitter.com/kVpcYkOv58
— ANI (@ANI) October 14, 2019
पृथ्वीवरील देव म्हणून डॉक्टरांना मानलं जात. परंतु मुंबईमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित्याच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरने तिच्यावर फसवून बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ काढून आरोपी तिला ब्लॅकमेल करत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Visit : bahujannama.com