मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai News |मुंबईच्या बोरिवलीBorivali) भागात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात एका वकिलावर तलवारीने जीवघेणा हल्ला (sword attack) केल्याची थरारक घटना घडली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलावरीने सपासप वार करुन पळ काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलThe video went viral on social media) झाला आहे. याप्रकरणी मुंबईतील (Mumbai News) एमएचबी पोलीस ठाण्यात (MHB Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
अॅड. सत्यदेव जोशी (Adv. Satyadeva Joshi) असं जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे.
ही घटना 8 जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे.
हा हल्ला जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचे समजतेय. मुंबईतील एका वकिलाने हल्ल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
अॅड. सत्यदेव जोशी यांच्यावर आज तलवार आणि अशा प्राणघातक शस्त्रे घेऊन कांदिवली(Kandivali) येथील स्थानिक गुंडांनी हल्ला केला.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे ट्विट अॅड. मदन गुप्ता (Adv. Madan Gupta) यांनी केले आहे.
https://twitter.com/AdvmadanG/
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली आहे.
कलम 307,326,324,504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/
हे प्रकरण जमिनीच्या वादातून घडल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये काही गुंड वकिलाभोवती उभे राहून तलावरीने मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
तर आजूबाजूला असलेले लोक मुकाट्याने उभे राहून हा प्रकार पहात असल्याचे दिसत आहे.
जोशींना वाचवण्याचा कोणीही प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Mumbai News | video sword attack on lawyer in mumbai in broad daylight shocking incident captured on camera.
Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव
Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना तरुण अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात