बहुजननामा ऑनलाइन टीम – महापालिकेकडे आता उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दोन महिने बाकी आहेत. उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या (Property tax payments )मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडे अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे मालमत्ता कराची देयके लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आता ई-मेलवर पाठविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी करदात्यांनी पालिकेच्या https://ptaxportal.
केवायसी अद्ययावत केल्यानंतर मालमत्ता करासंबंधीची सूचना ई-मेल आणि एसएमएसद्वारे करदात्यांना पाठवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे पालिका प्रशासन आणि करदाता या दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना मालमत्ता कर देयके वेळेत प्राप्त होतील. यामुळे वेळेवर कराचा भरणा होऊन दंडाची कारवाई टाळता येईल. तर पालिकेला वेळेत कर मिळू शकणार आहे. मात्र, मुंबईत मोठ्या प्रमाणात करदात्यांनी केवायसीची नोंद अद्याप केलेली नाही. तसेच ई-मेल आणि एसएमएसमुळे भविष्यातील मालमत्ता कराविषयक योजनेची माहिती नागरिकांना मिळणार आहे. करदात्यांच्या मालमत्तेत झालेल्या दुरुस्तीमुळे सुधारित देयके त्वरित उपलब्ध होतील. पालिकेच्या देयकांसाठी वापरात असलेल्या कागदाचा व त्यावरील पोस्टेज, पाकिटे, फ्रॅकिंग या बाबींचा खर्च टाळता येईल. वेळ व पैसा या दोन्हींबाबत करदात्यांसह पालिकेचीही बचत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.