बहुजननामा ऑनलाइन टीम – पतीनेच नवविवाहित तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील गोवंडी परिसरात घडला आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित महिलेचा जागीच मृत्यू(running train) झाला आहे. ही सर्व घटना एका सहप्रवाशी महिलेने पाहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित महिलेन या घटनेची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आरोपी पतीला अटक केली आहे. पूनम चव्हाण असे मृत्य महिलेचे नाव आहे. तर अन्वर अली शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिन्यापूर्वी आरोपी अन्वर शेक याचे लग्न पूनम चव्हाण या महिलेशी झाल होते. पूनमच हे दुसर लग्न होते. पूनमला तिच्या पहिल्या पतीपासून 3 वर्षांची मुलगी देखील आहे. पूनमने दुसर लग्न केल्यानंतर ती अन्वर शेखसोबत मानखुर्द येथील एका चाळीत राहत होती. सोमवारी तीनच्या सुमारास पूनम आणि अन्वर लोकलने प्रवास करत होते. यावेळी आरोपीने आपल्या पत्नीला लोकलमधून ढकलून दिले आहे.
यावेळी या जोडप्यासोबत प्रवास करणाऱ्या संगीता नावाच्या महिलेन हा प्रकार पाहिला. त्यानंतर संगीता यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठून संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. आरोपीनं ही हत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.