मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईतील (Mumbai News) आरे दूध कॉलनीजवळील (Aarey Milk Colony) एका पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुस (48 live cartridges) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 29) रात्री ऩऊच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. सापडलेली काडतुस 0.2 मिमी प्रकारची असून पार्किंग परिसरात ती कोणी सोडली आणि का सोडली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काडतुसं जप्त केली आहेत. Mumbai News | 48 live cartridges found in parking lot near Aarey Milk Colony of mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Ajit Pawar | अजित पवारांची सीबीआय चौकशीची भाजपकडून मागणी; राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया
स्थानिक पोलीस अधिकारी प्रसाद पिटले (Police officer Prasad Pitale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबईच्या आरे मिल्क कॉलनीतील एका पार्किंगमध्ये काही जिवंत काडतुसे (cartridges ) आढळल्याची माहिती स्थानिकानी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसानी घटनास्थळी धाव घेत काडतुस जप्त केली आहेत. पार्किंग (Parking) परिसरातील सीसीटीव्हीत काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत. हा पार्किंग परिसर गजबजलेला असल्याने या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ये-जा केली आहे. त्यामुळे संबंधित काडतुसे नेमकी कोणी ठेवली हे शोधण्यात अडचणी येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या पोलिसांकडून पार्किंग परिसरात तैनात सुरक्षा रक्षक आणि काडतुसे पाहिलेल्या अन्य साक्षीदारांचे जाब नोंदवून घेण्यात येत आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Web Title :- Mumbai News | 48 live cartridges found in parking lot near Aarey Milk Colony of mumbai
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Kisan Credit Card साठी अर्ज करण्याची मुदत आली जवळ, जाणून घ्या कशी आहे पद्धत