भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai-Nashik Highway | मुंबई – नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway ) माणकोली जवळील लोढा धाम नजीक भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनारथळी दाखल झाले होते.
नितीन बाळाराम काकडे (वय-२४), बेबीबाई बाळाराम काकडे ( वय ४८, रा. आमनेपाडा) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. मुलीच्या घरातील गणपतीचे दर्शन घेऊन परतत असताना मानकोली जवळील लोढा धाम येथे हा अपघात घडला. अपघात इतका होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने आमणे पाडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी अज्ञात वाहनाच्या चालकाविरूध्द पोलिस दप्तरी गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. पोलिस वाहनाचा क्रमांम मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आणि तपासाबाबतच्या सुचना दिल्या आहेत. आई आणि मुलाच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या संपुर्ण कुटूंबावर शोककळा पसरली आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गणपतीचे दर्शन घेवुन परत येत असताना ही घटना घडल्याने काकडे कुटुंबियांना दुःख अनावर झाले आहे.
Web Title : Mumbai-Nashik Highway | mother babybai kakde and son nitin kakde died in road accident bhiwandi.
Shivsena Vs BJP | माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार – संजय राऊत