ठाणे : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai-Nashik Highway Accident | मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला (Mumbai-Nashik Highway Accident) आहे. या दुर्घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या 14 वर्षीय मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. मधू भाटी (Madhu Bhati) असं त्या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbavadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गालगत असणा-या माजिवडा भागात झोपड्या आहेत. शुक्रवारी सकाळी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरून 1 ट्रक जात होता. ट्रक समोर असलेल्या वाहनाने अचानक त्याचे वाहन थांबविले. त्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगत असलेल्या एका झोपडीवर जाऊन उलटला. या झोपडीमध्ये मधू झोपली होती. तिच्या अंगावर हा ट्रक उलटला होता. (Mumbai-Nashik Highway Accident)
दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा ट्रक क्रेनच्या सहायाने बाजूस करून
मधूला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात (Thane District Government Hospital) हलवले.
मात्र तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Mumbai-Nashik Highway Accident | thane 14 year old girl dies after truck overturns on hut truck driver arrested
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर; जाणून घ्या
MP Rahul Shewale | “उद्धव ठाकरे लोकसभेत विजय मिळवून देऊ शकत नाहीत” – शिवसेना खासदाराचं विधान
NCRB Women Violence Report | NCRB : महिलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर