मुंबई न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Malad News । डायलिसिस मशीन (Dialysis Machine) फुटल्याने एका महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही महिला सध्या उत्तर मुंबईतील मालाड (Malad) पूर्वेला गोकुळनगर येथे राहतात. दरम्यान त्या महिला मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील (uttar pradesh) रहिवासी आहेत. सुलोचना यादव असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे 2006 वर्षांपासून डायलिसिस सुरू होते. सुलोचना यादव (Sulochana Yadav) यांच्या पतीची पीठाची गिरणी होती. मात्र 2006 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झालं. सध्या त्या एकट्याच रहात होत्या.
Mumbai Malad News | women death due to dialysis machine burst in malad area
अधिक माहितीनुसार, किडनी(Kidney)च्या विकाराने ग्रस्त असल्यामुळे सुलोचना यादव (Sulochana Yadav) यांचे डायलासिस सुरु होते. त्यांनी घरातच डायलिसिस मशीन घेतले होते.
परंतु हे मशीन जुने झाल्याने बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी हे डायलिसिस मशीन (Dialysis Machine) बदलले नव्हते.
दुर्देव म्हणजे काल सकाळी अचानक मशीन फुटली गेली. त्यावेळी सुलोचना जखमी झाल्या.
हा प्रकार शेजारी राहणाऱ्या स्थनिकांच्या लक्षात येताच तात्काळ याची माहिती कुरार पोलिसांना दिली.
यांनतर कुरार पोलिसांनी (Kurar police) सुलोचनाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सुलोचना यांना मृत घोषित केले आहे.
या दरम्यान, ‘या मृत्यूप्रकरणी कुरार पोलिसांनी (Kurar police) जबाब नोंदवला आहे.
मात्र, अंगावर संपूर्ण रक्त आल्याने सुलोचना यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे.
याची पोलीस चौकशी करत आहेत. डायलासिस मशीन फुटल्यामुळे सुलोचना यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मात्र, स्थानिकांनी हत्येचा संशय देखील व्यक्त केला आहे.
दरम्यान, शवविच्छेदन रेपोर्टनंतर सुलोचना यादवच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Web Title : Mumbai Malad News |women death due to dialysis machine burst in malad area.
Pune Crime News | पुण्यातील डेक्कन परिसरात इंजिनिअरची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
Aamir Khan | ‘अकेले हम अकेले तुम’ अमिर खानच्या भावाचाही झाला घटस्फोट, पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप
Pune News | वारजेतील सारस अर्बन सोसायटीच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करा; कोर्टाचे पोलिसांना निर्देश