मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज महाविकासआघाडीचा आज विश्वासदर्शक ठराव पारित झाला. यावरुन महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा सिद्ध झाला. परंतू आज विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीत मनसे तटस्थ राहिले. याशिवाय आज विश्वासदर्शक ठरावात जवळपास 4 आमदार तटस्थ राहिले. यात मनसेचा 1 आमदार, एमआयएमचे दोन आमदार आणि माकपचा 1 आमदार आहेत. आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावात महाविकासआघाडीच्या बाजूने 169 आमदारांनी मत दिले तर 4 आमदार तटस्ठ राहिले. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे बहुमत चाचणीत तटस्थ राहिले. विधानसभा निवडणूक विजयी झालेले मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार विधानसभेत आहेत. महाविकासआघाडी आपले बहुमत आज सिद्ध करतील.
बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 हा जादूई आकडा पार करणं आवश्यक होते. महाविकासआघाडीकडून 170 चे संख्याबळ असल्याचे सांगितले जात होते. यात सर्व पक्षांकडून आपापल्या आमदारांना व्हिप बजावण्यात आला होता. त्यानंतर आज महाविकासआघाडीने बहुमत सिद्ध केले.
असे असेल तरी मनसेने बहुमत चाचणीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आला होता. त्यामुळे या विश्वासदर्शक ठरावात महाविकासाआघाडीला मनसेची साथ लाभली नाही. विधानसभा हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांनी आज बहुमत चाचणी घेतली.
Visit : bahujannama.com