Mumbai High Court | मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु असताना ॲड. गुणरत्न सदावर्ते Bigg Boss मध्ये सहभागी; हायकोर्टाने झापलं

Adv.-Gunaratna-Sadavarte

मुंबई : Mumbai High Court | मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) दाखल याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारतर्फे ॲड. बिरेंद्र सराफ (Adv Birendra Saraf) अंतिम युक्तिवाद करणार आहेत. या सुनावणीदरम्यान कोर्टाने ॲड. सदावर्ते (Gunaratan Sadavarte) यांच्यावर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.

मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर मुंबई मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली दरम्यान ॲड. गुणरत्न सदावर्ते गैहजर असल्याने न्यायालयाने त्यांना झापल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसले आहेत, अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला मिळाली.

मराठा आरक्षण प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना याचं गांभीर्य नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या, अशी विनंती ॲड. गुणरत्न सदावर्ते करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असा सवाल हायकोर्टाने केला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असेही हायकोर्टाने नमूद केले.

मराठा आरक्षणावरील या सुनावणीत राज्य सरकारतर्फे ॲड. डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठा पुढील सुनावणी १९ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणीत कोर्टात काय युक्तिवाद होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.