मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यशस्वी मॉडल ते स्पर्धा परीक्षेतील टॉपर असणार्या तरुणीची सोशल मीडियावर तब्बल 16 फेक अकाउंट्स असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत देशात 93व्या क्रमांकावर आलेली ऐश्वर्या श्योराण या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे.
मॉडेल ऐश्वर्या श्योराण, माजी मिस इंडिया, फायनालिस्ट मिस इंडिया आणि सैन्य दलातील एका कर्नलची मुलगी ते युपीएससी टॉपर आणि आता आएएस अधिकारी असलेली तरुणी ही तरुणी प्रकाश झोतात आली. चहू बाजूंनी तिझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. पण हे सर्व सुरु असताना या सर्व आनंदवार विरजन पडेल अशी एक घटना ऐश्वर्या सोबत घडली. ऐश्वर्याच्या सोशल मिडियावरील अकाऊंटवर हजारो नेटकर्यांनी तिला अभिनंदनाचे मेसेज केले. त्यात तिझे जवळचे आणि नातेवाईक देखील होते. पण ऐश्वर्या त्या मेसेजवर काहीच रिप्लाय करत नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तिला फोन केला.
त्यानंतर ऐश्वर्याची अनेक बनावट अकाऊंट सोशल मीडियावर तयार करण्यात आल्याचे उघड करण्यात आले. सोशल मिडाया अकाऊंट बनवून त्यावर तिच्या नावाने पोस्ट केल्या जात आहेत. याबाबत तिने लगेच मुंबई माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या बनावट सोशल मिडिया खात्यांबाबत ते आता चौकशी करत आहेत.