मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Crime | मुंबईत मुलाकडून जन्मदात्या वयोवृद्ध आई-वडिलांची छळवणूक (Mumbai Crime) केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, न्यायालयाने (court) याप्रकरणी एक मोठा महत्वाचा निर्वाळा केला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आदेश देत संबंधित आरोपी मुलाला 10 दिवसांच्या आत आई-वडिलांचं आलिशान घर (Luxurious home) सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कुंटुंब मुंबईच्या जुहू परिसरात वास्तव्यास आहे. मुलगा, सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका न्यायालयानं केली आहे.
याबाबत माहिती अशी, आशिष दलाल (Ashish Dalal) असं संबंधित मुलाचं नाव आहे.
जुहू परिसरात एका अलिशान बंगल्यात मुलगा, पत्नी, आई-वडिल वास्तव्यास आहेत.
हे आई-वडिल साधारण 90 वयाच्या घरातले आहेत. त्यांची मुलाने आणि सुनेनं छळवणूक (Harassment) करुन त्रास देत होते. या प्रकरणामुळे त्या वृद्ध आई-वडिलाने देखभाल लवादाकडे याबाबत तक्रार दिली. आपल्या होणा-या अत्याचाराची माहिती दिली होती.
त्यांच्या या माहितीवरुन संबंधित लवादाने मुलाला, सुनेला आई वडिलांचं घर सोडण्याचे निर्देश दिले होते.
आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याअंतर्गत लवादानं हा आदेश दिला होता. दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबरमध्ये लवादानं हा निर्णय दिल्यानंतर मुलगा आशिष दलालने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र, न्या. गिरीश कुलकर्णी यांनी लवादाचा निर्णय योग्य ठरत याचिकाकर्त्याला (मुलगा आणि सुन) आई-वडिलांचं घर सोडण्याचे निर्देश कोर्टाने (court) दिले आहेत.
त्याचबरोबर 10 दिवसाच्या आत घर सोडण्याचं देखील सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘आपल्यासमोर हताश आईवडिलांची दु:खद कहाणी आहे.
त्यांना आयुष्याचा हा काळ शांततेत आणि आनंदात जगायचा आहे. त्यांच्या कमीत-कमी गरजा आहेत. पण श्रीमंत मुलामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षा आणि गरजांपासून वंचित राहावं लागत आहे. वृद्ध आणि गरजू पालकांची काळजी घेण्याऐवजी त्यांचा छळ केला जात आहे.
याचिकाकर्ता आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
या वयात मुलानं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडलं आहे. असं सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटलं आहे.
Web Title : Mumbai Crime | son and daughter in law harassed elderly couple court order to leave parents luxurious house in 10 days mumbai.
Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा