मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन अटक केलेल्या आरोपीला कोर्टात नेत असताना सिग्नलला थांबलेल्या पोलीस व्हॅनमधून हातकडीस पलायन केले. कांदिवली येथील सिग्नलवर हा थरार घडला. mumbai crime news a rape accused escaped from police custody on wednesday while the team was taking him to court after his rapid antigen test
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
अविनाश यादव (वय २१, रा. राठी, लक्ष्मीनगर, चारकोप) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे एका १७ वर्षाच्या मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. याचदरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध आले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल चारकोप पोलिसांनी अविनाश यादव याला अटक केली. २६ जून २०२१ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली.
काल सकाळी त्याला अँटीजन चाचणी करण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परत येत असताना पोलीस व्हँन कांदिवली सिग्नलजवळ थांबली होती. गाडी थांबताच त्याने संधी साधून अचानक पोलिसांना धक्का देऊन तो पळून गेला. त्याच्या उजव्या हातात हातकडी आहे. तिच्यासह तो पळून गेला असून चारकोप पोलीस शोध घेत आहेत.
Web Titel : mumbai crime news a rape accused escaped from police custody on wednesday while the team was taking him to court after his rapid antigen test
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू
Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु