मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai Crime | मुंबईमधील नवीन पनवेल (New Panvel) ठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका 60 वर्षांच्या वृद्धाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना पनवेल येथील ओवाळे परिसरात घडली आहे. आरोपींनी वृद्धाचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ (Mumbai Crime) उडाली आहे. बाळाराम चंदर पाटील (वय, 60, रा. नवीन पनवेल,ओवाळे परिसर) असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपीला बुलडाणा येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, बाळाराम पाटील (Balaram Patil) याची एका महिलेनं आपल्या एका पुरुष साथीदाराच्या मदतीनं निर्घृण हत्या केली आहे.
आरोपींनी बाळाराम पाटील यांचे हातपाय बांधत, त्यांच्या नाकातोंडात मिरचीपूड टाकून गळा आवळून हत्या केली आहे.
यानंतर आरोपींनी घरातील वीस तोळे सोने देखील चोरले आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तात्काळ तपासाला सुरुवात करून 2 आरोपींना अटक केले आहे.
तसेच, आरोपींकडून 17 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, आरोपी महिला (accused woman) बुलडाणा ते नवी मुंबई असा प्रवास करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांच्या पनवेल शहर पोलिसांच्या (Panvel City Police) डीबी पथकानं (DB Squad) आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.
आरोपी महिलेकडे चौकशी केली असता, तिने हा गुन्हा आपला पुरूष साथीदार मंगेश खेत्री (Mangesh Khetri) याच्या मदतीनं केल्याची माहिती दिली.
तसेच, या माहितीच्या आधारे बुलडाण्यात गेलेल्या पोलीस पथकाने आरोपी मंगेशला बुलडाण्यातून अटक केली आहे.
या अशा धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेचा पोलिसांनी 24 तासांत छडा लावला आहे.
Web Title : Mumbai Crime | first tied limbs and murder by strangulation two arrested in 24 hours
MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’
Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर