मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mumbai Bandra Building Collapse | मुंबईतील वांद्रे परिसरात दुमजली इमारत कोसळल्याची (Mumbai Bandra Building Collapsed) घटना घडली आहे. संबंधित घटना ही मध्यरात्री घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Died) झाला असून 16 जण जखमी (Injured) झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra | One person died and 16 people admitted with minor injuries after a G+2 structure collapsed at Shastri Nagar, Bandra West. Rescue operation underway: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/EJwQby3cxm
— ANI (@ANI) June 8, 2022
ही घटना वांद्र्याच्या शास्त्रीनगर मध्ये मध्यरात्री घडली. शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ (Western Express Highway) असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या दाखल झाल्या. मुंबई पोलीस (Mumbai Police) देखील तातडीने दाखल झाले. काहीजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती होती. त्यामुळे रात्रभर ढिगारा हलवण्याचं काम सुरू होतं. (Mumbai Bandra Building Collapse Collapse)
ढिगा-याखाली 16 जण अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. या 16 जखमींपैकी अनेकांना डोक्याला, हाताला, पायाला, तोंडाला, कमरेत मार लागला व जखमा झाल्या. या जखमींपैकी शाहनवाज Shahnawaz (वय, 40) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित 16 जखमींवर भाभा व खासगी रुग्णालयात (Bhabha Hospitals) उपचार करण्यात आले. जखमीमध्ये 2 अल्पवयीन मुले, 60 वर्षांवरील 3 व्यक्ती व तरुण मुले यांचा समावेश आहे. सध्या बहुतांश जणांना डिस्चार्ज मिळाला असून एकावर उपचार सुरू आहे.
Web Title :- Mumbai Building Collapse | Mumbai bandra building collapse one died and 16 injured
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Maharashtra Monsoon Update | वातावरणाच्या बदलामुळे मोसमी पाऊस लांबणीवर?
- Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसलेंना न्यायालयीन कोठडी, CBI कस्टडी वाढवून देण्यास कोर्टाचा नकार
- CM Uddhav Thackeray | ‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला
- Pune Pimpri Crime | पिंपळे गुरवमध्ये महिलेवर बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी; 9 जणांवर FIR
- Maharashtra IPS Transfer | राज्यातील 5 वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या