मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नालासोपारा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास केवळ १० वर्षे जुनी असलेली चारमजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रात्री इमारत कोसळत असल्याचे रहिवांशाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ सगळे रहिवाशी इमारतीबाहेर पडले.
त्यामुळे जीवितहानी झाली नाही. तसेच कोणीही जखमी नाही. मात्र, अनेक संसार इमारतीच्या खाली गाडले गेले. नालासोपारा पूर्वमधील संकेश्वरनगर भागात साफल्य इमारत मध्यरात्री कोसळली. इमारत कोसळण्याच्या आवाजाने रहिवाशांना जाग आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेळीत रहिवाशांनी इमारत त्वरीत रिकामी केली. अवघ्या काही वेळात इमारत जमीनदोस्त झाली.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक संसार ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.