या शेअरने केले मालामाल
टाटा टेलिसर्व्हिस महाराष्ट्र लिमिटेड (Tata Teleservices Maharashtra Ltd) या टाटा समूहा (Tata Group) च्या शेयरने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या समभागाने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. टीटीएमएलच्या स्टॉकने गेल्या वर्षभरात जबरदस्त कामगिरी केली आहे.
सध्या, TTML (Tata Teleservices Maharashtra Ltd- TTML) चा शेअर 206 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. महिनाभरापूर्वी 2 डिसेंबरला तो 124 रुपयांवर होता. एका महिन्यात तो जवळपास दुप्पट झाला आहे. (Multibagger Stock)
एका वर्षात 26 पट रिटर्न देणारा स्टॉक
गेल्या एक वर्षातील या शेअरचा रेकॉर्ड पाहता हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 206.35 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीटीएमएलच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याला 26 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या वर्षी जुलैमध्ये हा स्टॉक 54 रुपयांवर होता, तो आता 206 रुपयांवर आहे. जर एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वीही या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता 3.81 लाख रुपये मिळाले असते, म्हणजे सहा महिन्यांत तिप्पट नफा झाला असता.
कंपनीचे मजबूत मार्केट
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे, जी सध्या तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. एवढेच नव्हे तर टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेसने नुकतीच व्यवसायासाठी देशातील पहिली स्मार्ट इंटरनेट लीज लाईन सुरू केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत हायस्पीड इंटरनेट नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. क्लाऊड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल. या अर्थाने या कंपनीची बाजारपेठही मजबूत आहे.
डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)
Web Title :- Multibagger Stock | multibagger stock 2022 tata teleservices maharashtra ltd share give high return to investers high return stock
Pune Crime | पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटवली 4 वाहने; प्रचंड खळबळ