गुरुग्राम : वृत्तसंस्था – Mulayam Singh Yadav Passed Away | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Uttar Pradesh Former Chief Minister) आणि समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये (Medanta Hospital) मागील काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरु होते. महिन्यातून 2-3 वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. मात्र ऑगस्ट महिन्यापासून मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav Passed Away) यांची तब्येत खालावत चालली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Samajwadi Party supremo and former Uttar Pradesh CM Mulayam Singh Yadav passes away at the age of 82, confirms Akhilesh Yadav.
He was under treatment at Gurugram's Medanta hospital since last week. pic.twitter.com/qDYIuT5DcH
— ANI (@ANI) October 10, 2022
मुलायम सिंह यादव हे 22 ऑगस्टपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 2 ऑक्टोबरला दुपारी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाव कमी झाला होता. त्यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान (Dr. Naresh Trehan) आणि डॉ. सुशीला कटारिया (Dr. Sushila Kataria) त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुलायम यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेशातील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे.
तसेच 1996 ते 1998 दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये (Central Government) संरक्षणमंत्री (Defense Minister) होते.
1992 साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
5 डिसेंबर 1989 रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
1992 साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजे 5 डिसेंबर 1993 रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
Web Title :- Mulayam Singh Yadav Passed Away | mulayam singh passed away samajwadi leader mulayam singh yadav passed away he breathed his last at the age of 82
हे देखील वाचा :
Pune Crime | महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची तरूणाला धमकी, धनकवडी परिसरात युवकाची आत्महत्या
Jayant Patil | सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे सध्या महत्वाचे, जयंत पाटील यांनी मांडली पक्षाची भूमिका