मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारे भारतीय उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी (Mukesh Ambani Reliance). संपूर्ण जगात अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा डंका वाजताना पाहायला मिळत आहे. कोरोना सारख्या संकट काळात ही रिलायन्सच्या अनेक कंपन्यांनी दमदार कामगिरी केलीच पण त्याचबरोबर गुंतवणूकदारांनाही मालामाल केले. मार्केट कॅपमध्येच नाही तर रिलायन्स विविध क्षेत्रात उतरत असताना मुकेश अंबानी (Mukesh Ambani Reliance) यांनी मात्र, निवृत्तीचे संकेत दिले आहे. यामुळे उद्योगजगताच्या भुवया उंचावल्या आहे.
धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कंपनीच्या फॅमिली डे कार्यक्रमात रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे संकेत खुद्द मुकेश अंबानी (Mukesh Ambani Reliance) यांनी दिले आहेत. आम्ही आता फक्त त्यांना मार्गदर्शन, सक्षम केले पाहिजे. प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्यापेक्षा त्यांनी जास्त यश मिळवल्याने शांत बसून टाळ्या वाजवल्या पाहिजेत असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. आकाश, ईशा आणि अनंत हे पुढच्या पिढीचे नेतृत्व म्हणून रिलायन्सला आणखी उंच अशा यशाच्या शिखरावर नेतील. यात तिळमात्र शंका नाही. रिलायन्स प्रती त्यांची उत्कटता, वचनबद्धता आणि निष्ठा दररोज पाहू आणि अनुभवू शकतो. लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी माझ्या वडिलांची तीच ठिणगी आणि क्षमता मला त्यांच्यामध्ये दिसते अशा शब्दात त्यांनी कौतुकही केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भविष्याचा विचार करता रिलायन्स वाढीचा पाय घालण्याची वेळ आता आली आहे. एका कापड कंपनी म्हणून सुरु झालेली रिलायन्स आता विवध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या समूहात रुपांतरित झाली आहे. आम्ही आमचा ऊर्जा व्यवसाय पूर्णपणे री-इंजिनियर केला असून स्वच्छ आणि हरित ऊर्जा आणि सामग्रीमध्ये रिलायन्स जागतिक आघाडीवर आहे. जुन्या व्यवसायाचे परिवर्तन हे रिलायन्ससाठी सर्वात मोठे ग्रोथ इंजिन ठरेल, असा आशावादही मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतामुळे रिलायन्सचा उत्तराधिकारी म्हणून पुढे कोण येणार, याचीच चर्चा उद्योग जगतात सुरू झाली आहे. मुकेश अंबानी ६४ वर्षांचे असून त्यांनी २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्सचे अध्यक्षपद भूषविले होते. तेथून त्यांनी केलेली प्रगती साऱ्या देशाने पाहिली. त्यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. तिनही मुले दूरसंचार,
किरकोळ आणि ऊर्जा व्यवसायाचे काम पाहतात. एक महत्वाची बाब म्हणजे यापैकी कोणीही रिलायन्सच्या संचालक मंडळावर नाही. कंपनीच्या ज्या प्रमुख शाखा आहेत
त्यामध्ये ते संचालक म्हणून काम पाहतात. सूचीबद्ध कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदे विभाजित करण्यासाठी सेबीने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा अंबानी घेऊ शकतात.
Web Title :- Mukesh Ambani Reliance | reliance industries chairman mukesh ambani hints leadership transition know who will be next chief
Airtel Prepaid Offers | एअरटेलनं दिली नववर्षाची भेट ! ‘या’ Prepaid Plans वर डिस्काऊंट आणि इतर फायदे
MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय