बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मोहम्मद अली जिन्ना यांनी ११ सप्टेंबर १९८६ रोजी या जगाला निरोप दिला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. सार्वजनिक जीवनात धर्माच्या आधारावर सीमेसाठी लढणाऱ्या जीन्ना यांचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य मात्र खुप विरोधाभासी होते. स्वत: मोहम्मद अली जिन्ना यांनी पारशी मुलीशी लग्न केले तर त्यांची मुलगी दीना जिन्नाच्या विरोधात गेली आणि तिने एका बिगर मुस्लिम मुलाशी लग्न केले. दीना जिन्ना यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा वडिलांशी झालेल्या संघर्षामुळे ती अधिक ओळखली जात होती.
दिना वाडियाचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ रोजी झाला होता. ती मोहम्मद अली जिन्ना आणि रतीबाई पेटिट यांची मुलगी होती. तिच्या जन्मापासूनच दीनाने तिच्या पालकांना भंडावून सोडले होते. जेव्हा जिना आणि त्यांची पत्नी सिनेमात चित्रपट पाहत होते, तेव्हा दीना अकाली (प्रीमॅच्युअर) बाळ म्हणून जन्माला आली. दिना अगदी तिच्या आईसारखी दिसत होती. दीनाची आई जन्मजात पारशी होती, परंतु जिन्नाशी लग्न करण्यासाठी तिने आपला धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. जिन्नाच्या पत्नीच्या निधनानंतर, जिनाची बहीण फातिमा जीन्नांच्या घरी राहायला आली. जिनांनी फातिमाला दीनाला इस्लामला शिकवण्यास सांगितले. दीनाने बर्याच प्रसंगी सांगितले होते की, आत्या फातिमाशी तिचे संबंध चांगले नव्हते. वडिलांशी संबंध खराब होण्यासाठी ती आत्यालाच दोष द्यायची. दीना यांचे शिक्षण मुंबई आणि लंडन येथे झाले. या काळात जीन्ना आणि दीना एकत्रपणे वेळ घालवू शकले नाहीत. मात्र पत्नीच्या निधनानंतर जिना यांची मुलीशी अधिक जवळीक वाढली. ते तिची खास काळजी घेण्याचा नेहमी प्रयत्न करायचे.
दीना आणि तिचे वडील यांच्यात सर्व काही चांगले चालले असताना दीनाने बिगर मुस्लिम मुलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. दीनाला नेव्हिल वाडिया नावाच्या पारशी मुलाशी लग्न करायचे होते. मुस्लिम नसल्यामुळे जिना यांनी नेव्हिले सोबतच्या नात्याला नकार दर्शविला. मात्र दीनानेही हार मानली नाही. दीनाने वडिलांना सांगितले की त्यांची पत्नीही पारशी महिला होती. तर जिना यांनी उत्तरादाखल त्यांना सांगितले की, त्यांची पत्नी जरी पारशी महिला होती तरी तिने इस्लाम धर्म स्वीकारला, मात्र नेव्हिलेने असे काहीही केले नाही.
जेव्हा दीनाची नेव्हिल वाडिया यांची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हा त्या फक्त १७ वर्षाच्या होत्या. ते वर्ष १९३६ चे होते. नेविले यांचे वडील पारशी वडील आणि आई ख्रिश्चन होती. त्यांचे वडील नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध कापड उद्योगपती होते. नेव्हिले यांचा जन्म इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे झाला होता आणि त्यांनी केंब्रिजमधील मेलबर्न कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. जिन्ना आणि त्यांची मुलगी दीनाच्या वादाच्या प्रसंगाबाबत जीन्नाचे सहायक मोहम्मदाली करीम चगला यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये वर्णन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जेव्हा जिन्ना दीनाला विचारतात की भारतात लाखो मुसलमान असताना हा फक्त एक व्यक्ती तुझी वाट पहात आहे का?” तर दीनाने पटकन उत्तर दिले – भारतात लाखो मुस्लिम मुली असताना तुम्ही माझ्या आईशी (पारशी मुलगी) लग्न का केले ? ” पहिल्या पत्नीच्या निधनानंतर वर्षानंतर ते १६ वर्षाच्या रतीच्या प्रेमात पडले. मात्र दोघांच्या वयात खूप फरक होता. दोघांनाही समाजमान्य विवाह करायचा होता तर कायद्यानुसार न्यायालयात लग्नासाठी धर्माची शपथ घ्यावी लागली.