Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Murder Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Murder In Budhwar Peth Pune | मोबाईल चोरल्याच्या (Mobile Theft) संशयावरुन दोघांनी महिलेला काठीने मारहाण केली. त्यात महिलेचा मृत्यु झाला असून फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) खूनाच्या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतले आहे. (Murder In Budhwar Peth Pune)

वर्षा थोरात (वय ३५, रा. फिरस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार श्रीनाथ टॉकीजजवळ सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा थोरात ही फिरस्ता असून तिला दारुचे व्यसन आहे. अब्दुल सय्यद याची हातगाडी आहे. १० – १५ दिवसांपूर्वी अब्दुल याचा मोबाईल चोरीला गेला होता़ हा मोबाईल वर्षा हिने चोरल्याचा त्याला संशय आला. त्यावरुन त्याने व गौरव यांनी वर्षाकडे मोबाईल बाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने वर्षा जागेवरच निपचित पडली. हे पाहून लोकांनी तिला रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला. ही माहिती समजताच फरासखाना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.