मिस्टर अँड मिस पुणे एलिट’दुसऱ्या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन
![Mr. and Miss Pune Elite](https://i0.wp.com/bahujannama.com/wp-content/uploads/2020/12/Mr.-and-Miss-Pune-Elite.jpg?resize=640%2C360&ssl=1)
बहुजननामा ऑनलाइन टीम – ‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’(Mr. and Miss Pune Elite) दुसऱ्या पर्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 100 हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी 20 तरुण आणि 20 तरुणी यामध्ये अंतिम फेरीत पोहचल्या आहेत. खेड शिवापूर येथील नक्षत्र हॉल येथे रविवार (दि.13) सायंकाळी स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे.
स्टार्सट्रीम एन्टाईनमेंटचे डायरेक्टर सोहेल सय्यद म्हणाले की, तरुण आणि तरुणींना सक्षम बनविणे आणि सकारात्मक स्व-प्रतिमा विकसित करण्याची संधी देणे हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आम्ही तरुण पिढीला त्यांची कौशल्ये आणि वक्तृत्व क्षमता जोपासण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. या स्पर्धेद्वारे आयुष्यभर आठवणी निर्माण करणार्या संधीची पूर्तता आणि अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतो. पुण्यात दुसऱ्यांदा मिस्टर अँड मिस एलिट स्पर्धा आयोजित होत आहे. प्रश्नोत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड अशा विविध प्रक्रियेतून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, पोर्टफोलिओ शूट, ब्रँड शूट, मॉडेलिंग असाईनमेंट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.
डिजायनर ममता मंगलाणी, फेमिना मिसेस स्वाती सराफ, सेलेब्रिटी फोटोग्राफर अर्णब घोष, विनोद यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
Comments are closed.