मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MPSC Recruitment । मागील आठवड्यात पुण्यात एमपीएससी (MPSC) तरुण स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) याने आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. यावरून विरोधक देखील विधानसभेत सरकारविरुद्ध आक्रमक झाले होते. यांनतर आता राज्य सरकारने (State Government) बैठकीदरम्यान MPSC तरुणांना एक मोठा दिलासा दिला आहे. गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (General Administration Department) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी दिलीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC)’ घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदि विभागांना पद भरतीच्या निर्बंधामधून सवलत देण्यात आल्याची माहिती दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी दिली आहे.
एकूण MPSC ची 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने (Department of Finance) सन 2018 पासून मान्यता दिली आहे. त्यानुसार अशा पदांचे आरक्षण बघून पद भरती तात्काळ राबवली जाणार आहे. उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने MPSC सदस्यांची चार रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्या संर्भातही या झालेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर MPSC च्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या उद्देशाने या बैठकीत चर्चा केलीप्रतिवर्षी . जेणेकरुन भविष्यातील MPSC च्या मुलाखती गतीने पार पाडता येतील. असं दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) यांनी सांगितलं आहे. या दरम्यान, UPSC कडून पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी केले जाते. त्यानुसार आता MPSC च्या परीक्षांचेही वेळापत्रक जारी करण्याबाबतचे निर्देश देखील दिले गेले आहेत. असं भरणे म्हणाले.
2018 नुसार असलेली पदे –
गट.अ – 4 हजार 417
गट. ब – 8 हजार 31
गट. क – 3 हजार 63
एकूण पदे – 15 हजार 511
Web Titel : mpsc recruitment mega recruitment 15500 posts through mpsc thackeray government announcement
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update