नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, काही तासांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यावरून आता विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला.
अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला.आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती. @nsitharaman https://t.co/IwaBd8Z21X
— Supriya Sule (@supriya_sule) April 1, 2021
अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला आणि काही तासातच मागे घेतला. यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘अल्पबचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढही तात्काळ मागे घ्यावी ही विनंती’.
दरम्यान, घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरीही गाठली आहे. याच किमतीवरून केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच हे दर नियंत्रणात राहावे, यासाठी याचा समावेश जीएसटीमध्ये करावा अशीही मागणी केली जात आहे. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरावरून सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले.