पुणे :बहुजननामा ऑनलाइन – MP Supriya Sule | कोरोना (Corona) महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या संकटातून अर्थव्यवस्था सावरली असली तरी वाढत्या महागाईमुळे ऐन दिवाळीत (Diwali) सर्वसामान्यांचे दिवाळं काढलं आहे, असे राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रीया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे. तसेच मोदी सरकारच्या (Modi Government) ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे यंदा सण साजरा करताना सर्व सामान्यांच्या खिशाला महागाईची (Inflation) झळ बसणार आहे. हे सरकार देशात आणखी काही काळ राहिले तर आपल्या मुलांना दिवाळीचा फराळ मोबाईलमध्ये दाखवावा लागेल अशी टीका देखील सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर केली.
शारदा फाऊंडेशन (Sharda Foundation) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंबेगाव येथील जांभूळवाडी तलाव परिसरात नोकरी मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनशिव (Ganesh Vanshiv) व प्रिया वनशिव (Priya Vanshiv) यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संसदेत तरुणांच्या बेरोजगारीचा (Unemployment) व महागाईचा प्रश्न मांडणार आहे. महापालिका परत मिळवण्याच्या विचाराने नागरिकांनी येत्या पालिका निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हा कुठला न्याय?
आर्यन खानकडे (Aryan Khan) काहीच मिळाले नाह, अशी माहिती समोर येत आहे.
जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला 26 दिवस कोठडीत रहावे लागत असेल तर हा कुठला न्याय? त्यामुळे समाज म्हणून आपण सर्वांनी चिंतन केले पाहिजे.
त्यामुळे यावर केंद्र सरकारने उत्तर दिले पाहिजे. शाहरुख खान हा महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. आम्ही परदेशात जातो तेव्हा बॉलिवूडबद्दल खूप विचारले जाते. अशा चुकीच्या गोष्टीमुळे बॉलिवूड आणि देशाचे नाव एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे जगभरात बदनाम होते, असेही त्यांनी सांगितले.
web title: mp supriya sule due poor management modi government general public went bankrupt said mp supriya sule.
T20 World Cup | अजूनही टॉप 2 मध्ये राहू शकतो भारत, नॉकआऊटसाठी करू शकतो ‘क्वालिफाय’