MP Supriya Sule | अजित पवारांनंतर सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांना सुनावलं, म्हणाल्या – ‘इतक असंवेदनशील…’ (व्हिडिओ)

MP Supriya Sule | do not be so insensitive say baramati ncp mp supriya sule to vijay wadettiwar

पुणे : बहुजननामा ऑनलाईन भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनाला तीन दिवस होत नाहीत तोच पोटनिवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पुणे लोकसभा पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By-Election) लढवण्याची इच्छा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Congress Leader Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केली. त्यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनावले यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सुनावलं आहे. खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बापटांसोबत संसदेतील कामकाजातील आठवणींना उजाळा दिला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या विधानाबाबत सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना विचारले असता त्या म्हणाल्या, गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवस झाले असून त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामधून स्थिर तर होऊ द्या. राजकारण तर होतच राहील. पण इतकं असंवेदनशील होऊ नये, अशा शब्दात त्यांनी वडेट्टीवार यांना सुनावलं.

 

 

आम्ही एक उत्तम मार्गदर्शक गमवला
बापट यांच्यासोबत संसदेतील कामकाजाबाबत आठवणींना उजाळा देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, गिरीश बापट यांना संसदेत थोडाच काळ घालवता आला. त्या कालावधीत त्यांनी सभागृहातील सर्व खासदारांसोबत चांगला संवाद राखण्याचं काम केले. तसेच आम्ही वेगवेगळ्या संघटनेचे असलो तरी देखील त्यांच्याकडे कोणतही काम घेऊन गेल्यावर त्यांनी कायम मार्गदर्शन करण्याचं काम केलं. बापट यांनी कधीच अंतर येऊ दिलं नाही. त्यामुळे आम्ही एक उत्तम मार्गदर्शक गमवून बसलो असल्याचे त्यांनी सांगितले.

माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही – अजित पवार
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी त्यांना चांगलंच सुनावले आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बाधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाले आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जनाची नाही, तर मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील, अशा शब्दात अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या विधानाचा समाचार घेतला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटले
की, आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहोत.
तसेच भाजपने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत.
त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल,
ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेन, असे वडेट्टीवर यांनी म्हटले.

 

Web Title :- MP Supriya Sule | do not be so insensitive say baramati ncp mp supriya sule to vijay wadettiwar

 

हे देखील वाचा :

Pune PMC Property Tax | 40 टक्के कर सवलतीचा निर्णय मंत्री मंडळापुढे प्रलंबित ! 2023-24 या आर्थीक वर्षाची बिलांचे 1 मे नंतर वाटप

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी दोन दिवसात रोखला सलग दुसरा बालविवाह

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 संपन्न

<MLA Eknath Khadse | ‘जे गोपीनाथ मुंडेंसोबत घडलं तेच पंकजा मुंडेंसोबत घडतंय’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट