मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – MP Navneet Kaur Rana News | मागील दोन दिवसापासून मुंबईत पावसाने (Mumbai Rain) तुफान धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र मुंबई परिसरात पावसाने जलमय करून टाकलं आहे. पावसामुळे रस्त्यावर वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे जीर्ण भिंती पडत आहे. दरड कोसळून मोठ्या प्रमाणात दुर्घटना देखील झाल्या आहेत. यात 37 जणांचा प्राण गेला आहे. या तुफान पावसावरून मुंबईतल्या राजकारणाला वेगळं वळण लागताना दिसत आहे, तर या मुद्यावरून भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. त्यातच आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (MP Navneet Kaur Rana) यांनी देखील मुंबई पालिकेच्या (BMC) कारभारावरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लक्ष केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबईतील या विदारक पूरस्थितीवर खासदार नवनीत कौर (MP Navneet Kaur Rana) यांनी भाष्य केलं आहे. नवनीत कौर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, पावसामुळे महाराष्ट्राची विशेषत: मुंबईची देशात बदनामी होत आहे, विविध राज्यांतील माध्यमांचे प्रतिनिधी मुंबईत येऊन येथील ड्रेनेजवर भाष्य करत आहेत. ज्या मुंबई महापालिका (BMC) मध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून ठाकरेंच राज्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेला फंड एकीकडे आणि BMC ला मिळणारा फंड एकीकडे आहे. दरवर्षी मुंबईत 2 दिवसांच्या पावसानंतर रस्ते बंद होतात, रेल्वे ट्रॅक बंद होतात, दुर्घटना घडतात, वातावरण थांबून जाते, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरें (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे खा. नवनीत कौर म्हणाल्या, ‘दरवर्षी पावसाळ्यापूर्वी BMC चे लोकं कोट्यावधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. BMC च्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी, केंदाने संसदीय समिती नेमण्याची गरज आहे. त्यावेळीच, BMC कडून किती रुपये खर्च केला जातो, हे जनतेसमोर येईल. त्यामुळे, मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करणार असल्याचं देखील नवीनीत कौर (MP Navneet Kaur Rana) यांनी म्हटलं आहे.
Web Title :- mp navneet kaur rana mumbai rain mumbai flooded every year thackeray family who have been running bmc 3 generations fail
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Central Universities CET | UGC ची मोठी घोषणा ! केंद्रीय विद्यापीठांमधील सीईटी परीक्षा रद्द
Aurangabad Crime | लष्करी छावणीतील झाडाला गळफास घेत जवानाची आत्महत्या; प्रचंड खळबळ
Google Chrome चा वापर करणार्यांनी व्हावे सावध, ताबडतोब करा हे काम अन्यथा होईल मोठे नुकसान