बहुजननामा ऑनलाईन टीम : कमलनाथ सरकारमध्ये क्रीडा व युवा कल्याण तसेच वरिष्ठ शिक्षणमंत्री जितू पटवारी यांचा कार्यकर्त्यांवर नाराजीचा विडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते काँग्रेसचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेत आल्यावर त्यांना बाहेर काढायला लागले. यादरम्यान त्यांना धक्का-बुक्की झाल्यामुळे त्यांनी रागाच्या भरात कार्यकर्त्यांना लाथा मारून बाहेरचा रस्ता दाखवला.
शांति, अनुशासन और कार्यकर्ताओं को प्रोत्साहित करने वाली कांग्रेस पार्टी का एक नजारा pic.twitter.com/qFMrvcVz02
— Gopal Bhargava (@bhargav_gopal) December 30, 2019
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सुट्टीसाठी राज्याच्या बाहेर गेले आहेत. परंतु त्यांचे मंत्री प्रभारी जिल्ह्यांमध्ये मोर्चे करत आहेत. जितू पटवारी हे एक दिवसाच्या मुक्कामासाठी रिवा येथे गेले होते. त्यावेळी रिवा सर्किट हाऊस मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. पण पत्रकार परिषद ज्या हॉलमध्ये होत होती त्या हॉलमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जबरदस्तीने घुसत होते. त्यामुळे धक्काबुक्की झाली.
याचाच राग आल्याने जितू पटवारी यांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्यांना धक्का लागल्याने त्यांनी स्थानिक कार्यकर्त्याला बाहेर करण्यासाठी लाथ मारून नंतर पाठीवर हात मारत बाहेर केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक भाजप नेते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
Visit : bahujannama.com