MP Imtiaz Jalil | गिरीश महाजनांच्या आरोपांवर इम्तियाज जलील भडकले, म्हणाले-‘मला वाटायचं गिरीश महाजनांना थोडी अक्कल…’

 MP Imtiaz Jalil | imtiaz jaleel says girish mahajan had no common sense chhatrapati sambhaji nagar riots

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन – संभाजीनगर मधील किराडपुरा भागात रामनवमीच्या (Ram Navami) आदल्या दिवशी दंगल झाली. समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांसह खासगी गाड्यांवर दगडफेक करत जाळपोळ (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला. या घटनेला खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) असल्याचा आरोप भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी केला आहे. महाजन यांच्या आरोपांवर इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले महाजन?

संभाजीनगर मध्ये जे घडले त्याला इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी नुकतेच केलेले 15 दिवसांचे आंदोलन कारणीभूत आहे. त्यामुळेच तिथली परिस्थिती बिघडली आहे. जलील यांच्या आंदोलनादरम्यान अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. त्यांच्या आरोपांना जलील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.

 

 

काय म्हणाले इम्तियाज जलील?

इम्तियाज जलील म्हणाले, मला आधी वाटायचं गिरीश महाजन उच्च शिक्षित आहेत. त्यांना थोडी अक्कल असेल, पण तसं नाही.
मी 14 दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही ठिय्या मांडून बसलो. कँडल मार्च काढला.
एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर केलं. एकूण तीन आंदोलनं केली तरी कुठेही कोणाताही अनुचित प्रकार घडला नाही.

जलील पुढे म्हणाले, आमच्या आंदोलनावेळी कुठेही हेट स्पीच ऐकायला मिळाले नाही.
तरी देखील माझ्यासह 29 जण आणि इतर 1500 अनोळखी लोकांविरोधात गुन्हे दाखल केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- MP Imtiaz Jalil | imtiaz jaleel says girish mahajan had no common sense chhatrapati sambhaji nagar riots

 

हे देखील वाचा :

Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य

Bharatiyam 2023 | ‘भारतीयम २०२३’ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद ! भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यशस्वी आयोजन

Jitendra Awhad | सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक तर बाकीच्यांचे काय?, संयोगिताराजेंच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल