MIM चे खासदार इम्तियाज जलील यांना ‘कोरोना’ची लागण

imtiaz-jaleel

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जलील यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. जलील यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून आपल्याला लक्षणे जाणवू लागल्यानंतर आपण विलगीकरणात आहे.

आज कोविड चाचणीचा अहवाल आला असून त्यात चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.