पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहर काँग्रेसने (Pune Congress) सुरु केलेल्या विनामूल्य छत्री दुरुस्ती (Free umbrella repair) उपक्रमावरून भाजपने सोशल मिडियावर बरीच टर उडवली गेली होती. 70 वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता काही भाजपची धडगत नाही, अशा या पोस्ट होत्या. पण याच केंद्रात आज शुक्रवारी (दि.18) भाजपची एक छत्री दुरुस्तीला आली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोच क्षण साधून सगळ्या चेष्टेची, टवाळीची भरपाई केली (mp girish bapat).
पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये हा विमामूल्य छत्री दुरुस्तीचा उपक्रम सुरु केला आहे. आज या केंद्रात एका नागरिकाने चक्क भाजपची पुण्यातील खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे नाव असलेली एक छत्री (Umbrella) आणून दिली. तिची रंगसंगती भाजपाच्या (BJP) झेंड्याप्रमाणे असून त्यावर कमळाचे चिन्ह आहे. नाईक नावाच्या शनिवार पेठेतील एका आजोबांनी ती दुरुस्तीसाठी आणून दिली आहे. छत्री दुरूस्ती करणारे रोहिदास कांबळे म्हणाले की, छत्रीच्या काड्या तुटल्या असून कापड साधे असल्याने विरले आहे. बहुधा ती वाटपातील असावी. मी ती दुरूस्त करून देणार आहे. काँग्रेसचे सोशल मिडिया आघाडीचे चैतन्य पुरंदरे यांनी हा क्षण बरोबर आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे.
कृपया हे देखील वाचा:
धक्कादायक ! पोटच्या 6 दिवसाच्या बाळाला पालकांनीच 3.6 लाखांना विकलं, 6 जणांना अटक
Mumbai Police Property Cell । विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेलाआतापर्यंत 50 वेळा अटक
पिंपरीमध्ये पान टपरीत विकला जात होता गांजा; चालकाला पकडून 823 ग्रॅम गांजा जप्त