पुणे न्यूज :बहुजननामा ऑनलाईन – MP Chhatrapati Sambhaji Raje |मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) आंदोलन पुकारणारे राज्यसभेचे खासदार संभाजीराजेंनी (MP Chhatrapati Sambhaji Raje) पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता आगामी मूक आंदोलन नांदेड येथे होणार आहे. असं खा. संभाजीराजेंनी पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत म्हटलं आहे. तसेच, त्यांनी जुलै महिन्यात कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतल्यानंतर तर्कवितर्क लढवणाऱ्यांना देखील आपल्या भाषणामधून चांगलाच टोला देखील लगावला आहे. दरम्यान, या भाषणात बोलताना त्यांनी आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचं अधोरेखित केलं आहे. दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाही, असं देखील खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे.
आज पुण्यात (Pune) खासदार छत्रपती संभाजारीजे (MP Chhatrapati Sambhaji Raje)
यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं खा. संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं आहे.
यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बैठकी दरम्यान बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे की, दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचं नाहीय,
असं सांगत संभाजीराजेंनी ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्यायाचा आहे,
असं त्यावेळी असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.
दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी नांदेड (Nanded) येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा
या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा (Maratha Kranti Muk Morcha) समन्वयकांनी
केलीय.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, ‘मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलोय अशा शब्दात त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केलीय.
मात्र त्याचवेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक
किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी (MP Chhatrapati Sambhajarije)
केलीय.
”माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे.
तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.
Web Title : MP Chhatrapati Sambhaji Raje | maratha reservation bjp mp chhatrapati sambhajiraje says we are dealing with issue with co operative approach
Pune Crime | जिल्हा न्यायालयाकडून अॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी