वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने खा. रामदास तडस यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला. यावेळी खा. तडस यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी खा. रामदास तडस यांनी निवडणूकीच्या अधीच धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार असून भाजपा सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे हे आरक्षण लवकरच जाहीर होईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
गेल्या निवडणूकीत भाजपाने आम्ही सत्तेवर आल्यास धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करू असे आश्वासन दिले होते. पण अद्यापही ते आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे येत्या निवडणूकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा धनगर समाज आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी धनगर समाज सेवा संस्थेचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस जितू गोरडे, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनायक नन्नोरे, सचिव कवडू बुरंगे, रामेश्वर लांडे, रामभाऊ ढोले, सुधाकर उघडे, उद्धवराव ढोकणे, माणिकराव बुरांडे, सुनील उपासे, दिवाकर धवने, केशव नन्नोरे, बाळकृष्ण गराड, अमीत सरोदे, सचिन ढोले, मनोहर ढवळे, ज्ञानेश्वर ढोले, गोविंद पांगूळ, दिलीप ढोले, उमेश लहाने, विजय घोडे, किशोर ढवळे, रामभाऊ खूजे, सुरेश नन्नोरे, सुनील नन्नोरे, वैभव ढाले, लक्ष्मण नन्नोरे, माणिक खराबे, रवी ढामसे, भुजंगराव ढवळे, अजय नन्नोरे आदी उपस्थित होते.