नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील प्रमुख दूध पुरवठा करणारी मदर डेअरीने दिल्ली एनसीआरमध्ये गायीच्या दूधाचा दर 2 रुपयांनी वाढवून 44 रुपये केला आहे. शुक्रवार पासून नवीन किंमत लागू करण्यात आली आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, ती शेतकऱ्यांकडून कच्चे दूध घेण्यासाठी जास्त रक्कम देत आहे. त्यामुळे गाईच्या दूधाचे दर वाढवण्यात आले आहे.
मदर डेअरीचे प्रवक्ता म्हणाले की, “गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गायीचे कच्चे दूध खरेदी करण्यासाठी अडीच ते तीन रुपये प्रतिलिटर अधिक किंमत अदा करावी लागत आहे.”
पुढे ते म्हणाले की, “कच्च्या दूधाचे दर वाढल्याने दूधाचे दर वाढवण्यात आले आहेत. 6 सप्टेंबरपासून गायीच्या दूधाच्या अर्ध्या लिटरचे दर 23 रुपये आणि एक लिटरचे दर 44 रुपये प्रतिलिटर होणार आहे. यानंतर आता अमूल आणि पराग यांसारख्या कंपन्याही दूधाचे दर वाढवू शकतात.
मदर डेअरीकडून दिल्ली एनसीआरमध्ये 30 लाख लिटर दूधाचा पुरवठा केला जातो. या 8 लाख लिटर गायीचं दूध असतं. यावर्षी मदर डेअरीने मे महिन्यात दूधाचे दर 2 रुपयांनी वाढवले होते. गायीच्या दूधाच्या एक लिटरच्या पॅकचे दर वाढवण्यात आलेले नाहीत.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी