गरम पाणी प्या
दिनक्रम ठरवा की सकाळी सर्वात आधी गरम पाणी प्यायचे. त्यात लिंबू आणि मधाचे काही थेंबही टाकू शकता. मात्र, जर तुम्ही साधे पाणी प्यायले तर खूप फायदा होईल.
आळस सोडून करा व्यायाम
थंडीच्या दिवसात व्यायाम करायला कोणालाच आवडत नाही आणि लोक लवकर अंथरुण सोडत नाहीत. परंतु, सकाळी फक्त 30 ते 45 मिनिटे हलका व्यायाम करूनही तुम्ही वजन कमी करू शकता.
तसेच निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता. मात्र, व्यायाम करण्यापूर्वी थोडे खावे, कारण रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने चक्कर येऊ शकते. व्यायामापूर्वीच्या आहारात कोणताही रस किंवा स्मूदी पिऊ शकता. (Morning Habits-Weight Loss)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रिकाम्या पोटी चहा कॉफी पिऊ नका
अनेकांना सवय असते की ते सकाळची सुरुवात एक कप चहा किंवा कॉफीने करतात. ही सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, कारण यामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते आणि रिकाम्या पोटी कॅफिनचे सेवन केल्यास अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. सकाळी चहा किंवा कॉफीऐवजी ग्रीन टी पिऊ शकता.
सूर्यप्रकाश अंगावर घ्या
सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता तर पूर्ण होतेच, पण ऊर्जाही मिळते. शिवाय, वजन कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.
नाश्ता वगळू नका
धावपळीत लोक नाश्ता करत नाहीत आणि थेट दुपारी जेवण करतात. ही खूप वाईट सवय आहे, कारण भुकेल्या पोटाला सकाळच्या नाश्त्याची खूप गरज असते. यासाठी नाश्त्यात फळे, चीज, दही, अंडी, चीज, नट्स या गोष्टींचा समावेश जरूर करा.
Web Title :- Morning Habits-Weight Loss | adopt these 5 morning habits for weight loss