मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Money Laundering Case | मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने (ED) गेल्या पाच महिन्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना चौकशीला हजर राहण्याचीसाठी पाच वेळा समन्स जारी (Summons issued) केले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अज्ञातवासात गेलेल्या अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) हालचाली पुन्हा वाढल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात (Money Laundering Case) सीबीआयने त्यांच्या कार्यालय व घरावर 5 वेळा छापे टाकले आहेत.
अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभगाला (CBI) कळवण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांना पकडण्यासाठी मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur) या ठिकाणी सीबीआयकडून (CBI Raids) छापेमारी केली जाण्याची (Money Laundering Case) शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिल देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. परंतु, त्यांना दिलासा न मिळाल्याने सीबीआय व ईडीकडून अटकेची (Money Laundering Case) कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिल देशमुख अज्ञातवासात आहेत. मात्र, वरिष्ठांनी त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याने तपास यंत्रणांनी पुन्हा गतीने हालचाली सुरु केल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले.