बहुजननामा ऑनलाईन – सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (BSNL) सिमकार्ड बदलण्याऐवजी किंवा रिप्लेस करण्यावर लागणारे शुल्क कमी केले आहे. बीएसएनएलने किंमत ५० टक्क्यांनी कमी केली असून आता सेवेसाठी व्यक्तींना ५० रुपये द्यावे लागतील.
सिम बदलण्याची ऑफर ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत उपलब्ध असेल
मागील वर्षी बीएसएनएलने सिम बदलण्याची किंमत 10 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत वाढविली होती. किंमतीत दहापट वाढ केल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही, आता बीएसएनएलने त्याची किंमत कमी केली आहे. कंपनीने एक अधिसूचना जारी केली आहे की, सिम बदलण्याची किंमत 50% कमी केली आहे. आता बीएसएनएल सिम वापरणाऱ्या व्यक्तींना १०० रुपयांऐवजी फक्त ५० रुपये सिम बदलण्यासाठी द्यावे लागतील. बीएसएनएलच्या दिलेल्या माहितीनूसार, सिम बदलण्याची ऑफर १ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत उपलब्ध असेल.