Mohsin Shaikh Murder Case | संपूर्ण देशात गाजलेल्या पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, हिंदु राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह सर्वांची निर्दोष मुक्तता

Mohsin Shaikh Murder Case | mohasin shaikh death case pune session court released all accused with dhananjay desai due to lack of strong evidence

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Mohsin Shaikh Murder Case | संपूर्ण देशात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणात शुक्रवारी (दि.27) पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मोहसीन शेख हत्या प्रकरणात (Mohsin Shaikh Murder Case) हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह (Hindu Rashtra Sena Chief ) वीस जणांवर हत्येचा आरोप होता. न्यायालयाने धनंजय देसाई याच्यासह गुन्ह्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेख (Engineer Mohsin Shaikh) याची जमावाने 2 जून 2014 रोजी हत्या (Mohsin Shaikh Murder Case) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांना येरवड्यातून अटक (Arrest) केली होती. हडपसरमध्ये 2 जून 2014 ला दंगल उसळली होती. यामध्ये मोहसीन शेख याचा मृत्यू झाला होता. मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेख याने फिर्य़ाद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी धनंजय राजाराम देसाई याच्यासह 20 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली होती.

 

काय आहे प्रकरण?

महापुरुषांबद्दल वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर धनंजय देसाईनं भाषण केलं होते. या भाषणानंतर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेखला मारहाण केली होती. यामध्ये मोहसीन याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम (Public Prosecutor Ujjwal Nikam) यांनी माघार घेतली होती. आता पुणे सत्र न्यायालयाने हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

न्यायालयाच्या निर्णयावर दु:ख झाले

मोहसीन हा आयटी अभियंता होता. तो मूळचा सोलापूरचा होता. ते पुण्यात कामासाठी स्थायिक झाला होता.
परंतु मुस्लिम होता एवढ्याच कारणातून त्याची विनाकारण हत्या केल्याने त्याच्या कुटुंबिय व मित्र,
सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
न्याय मिळावा यासाठी त्यांनी मागील अनेक वर्षापासून संघर्ष केला.
मात्र आज न्यायालयाच्या निर्णयावर आम्हाला दु:ख झालं, अशा भावना मोहसीनच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

 

 

Web Title :- Mohsin Shaikh Murder Case | mohasin shaikh death case pune session court released all accused with dhananjay desai due to lack of strong evidence

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | पुण्यात विचित्र अपघात! अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक, दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू

Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग करुन दिली धमकी, दापोडी परिसरातील घटना

Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…