मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सिने अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज खास मुलाखत घेतली. यावेळी मोदींनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
माझेच प्रश्न आणि माझीच उत्तरे ही नरेंद्र मोदींची वृत्ती कायम आहे. अक्षयकुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली नसून मोदींनी अक्षयकुमारला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. प्रश्नांची यादीही मोदींनीच दिली असणार !
मोदीजी, जरा रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्या की !#ModiWithAkshay
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखातीच्या प्रश्नांची यादी मोदींनीच दिली असणार, अशी टीका केली आहे.पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले कि, माझेच प्रश्न आणि माझीच उत्तरे ही नरेंद्र मोदींची वृत्ती कायम आहे. अक्षयकुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली नसून मोदींनी अक्षयकुमारला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. प्रश्नांची यादीही मोदींनीच दिली असणार! , मोदीजी, जरा रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्या की, अशा शब्दात नरेंद्र मोदींवर घणाघात केला आहे.