Modi Govt – Logistics Park | मोदी सरकारकडून मराठवाडा-विदर्भासाठी मोठे गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार झाला फायनल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Govt – Logistics Park | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण मोठ्या प्रमाणात तापले. यावरून विरोधकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर आता मोदी सरकारकडून मराठवाडा आणि विदर्भाला मोठं गिफ्ट देण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारत माला प्रकल्पाअंतर्गत लॉजिस्टिक पार्क (Logistics Park) तयार करण्यासंदर्भातला करार आज करण्यात आला. या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. हा लॉजिस्टिक पार्क जालन्यामध्ये तयार होणार आहे.
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari, केंद्रीय मंत्री @sarbanandsonwal, आणि राज्याचे उद्योग मंत्री @samant_uday , मंत्री @AbdulSattar_99, आणि अन्य मंत्री यांच्या उपस्थितीत #जालना येथे मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्कसाठी एनएचएलएमएल आणि जेएनपीए यांच्यात आज करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. pic.twitter.com/IR5va2greT
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 21, 2022
या लॉजिस्टिक पार्कमुळे इतर भागातील उद्योगासोबत संबंध तयार होतील, याबरोबर आता मुंबईला जाऊन कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तता आता जालन्यातच (Jalna) पूर्ण होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडून देण्यात आली आहे. लॉजिस्टिकचा हा प्रकल्प 450 कोटींचा आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचेसुद्धा रावसाहेब दानवे यांच्याकडून सांगण्यात आले. (Modi Govt – Logistics Park)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबाद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हे ,तसेच बुलढाणा भागातील व्यापार
उद्योगमालाची वाहतूक वेगवान आणि कमी खर्चात होणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
Web Title :- Modi Govt – Logistics Park | multi modal logistics park approved by jnpa and nhlmal bharat mala jalna news
हे देखील वाचा :
Kidney Stone | नवजीवन ॲग्रो अँड फार्माचे मुतखड्यावर खात्रीशीर रामबाण उपाय ‘नवजीवन स्मॅशस्टोन’
Comments are closed.