नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये अशा विमा योजनेची सुरुवात केली या विमा योजनेच्या माध्यमातून वर्षाला 330 रुपये प्रीमियमवर 2 लाख रुपयांचा विमा मिळू शकतो. ‘प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना’ असे या विमा योजनेचे नाव आहे.
‘प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना’ या विमा योजनेसाठी 330 रुपये वार्षिक प्रीमियम आहे. या योजनेसाठी 18-50 वर्षापर्यंतची कोणतीही भारतीय व्यक्ती पात्र ठरू शकते. जीवन ज्योति बीमा पॉलिसीची मॅच्युरिटीचे वय 55 वर्षे आहे. या टर्म प्लानला दरवर्षी रिन्यू करणे गरजेचे आहे. याची अश्योर्ड रक्कम 2 लाख रुपये आहे.
काय आहे विशेष ?
देशातील प्रत्येक व्यक्तीला जीवन विमा लाभ मिळण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 9 मे, 2015 मध्ये ‘प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना’ची सुरुवात केली. हा विमा खरेदी केल्यानंतर मेडिकल तपासणीची गरजही भासणार नाही. ही पॉलिसी खरेदी करणे खूपच सोपं आहे. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन किंवा घरबसल्या तुम्ही नेटबँकिंगच्या माध्यमातून या स्कीमअंतर्गत पॉलिसी खरेदी करू शकता. या स्कीमच्या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. याचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. हा प्रीमियम तुम्हाला तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधून ऑटो डेबिट करता येऊ शकतो.
…तर कव्हरचा फायदा तात्काळ मिळणार
जर एन्रॉल केल्यानंतर 45 दिवसांच्या आत विमाधारकाचा सामान्य मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर मिळेल. मात्र, जर मृत्यू दुर्घटनेत झाला तर विमा कव्हरचा फायदा तात्काळ मिळू शकतो.