नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government | खेलरत्न पुरस्काराबाबत मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडक्षेत्रात दिले जाणारे सर्वात मोठे अवॉर्ड राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या नावावर करण्यात आले आहे. हे अवॉर्ड आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) म्हणून ओळखले जाईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वता ट्विट करून याची माहिती दिली आहे. दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजे 30 ऑगस्टला खेळाशी संबंधीत अवॉर्ड दिले जातात.
पीएम मोदी यांनी दिली माहिती
शुक्रवारी पीएम मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, ऑलम्पिक खेळात भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नांनी आपण सर्व भारावून गेलो आहोत. विशेषता हॉकीत आपल्या मुला-मुलींनी जी इच्छाशक्ती दाखवली आहे, विजयाप्रती जी दृढ इच्छा दर्शवली आहे, ती वर्तमानातील आणि येणार्या पीढ्यांसाठी खुप मोठी प्रेरणा आहे.
मेजर ध्यानचंद यांना केले समर्पित
पीएम मोदी यांनी पुढे म्हटले देशाल अभिमान वाटावा अशा क्षणी अनेक देशवासियांची विनंती समोर
आली आहे की खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांना समर्पित केले जावे. लोकांची भावना
पाहता याचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार केले जात आहे. जय हिंद!
पीएम मोदी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले, मेजर ध्यानचंद भारताच्या त्या प्रमुख खेळाडूंपैकी
एक होते ज्यांना भारताला सन्मान आणि गौरव मिळवून दिला. देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांच्याच नावाने ठेवला पाहिजे.
खेलरत्न पुरस्कार 1991-92 मध्ये देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता.
Web Title : modi government rajiv gandhi khel ratna awards renamed as mejar dhyan chand khel ratna awards pm narendra modi
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
EPF |EPF अकाऊंटमध्ये झाली चूक, तर दुरूस्त करू शकता; जाणून घ्या सोपी पद्धत
Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्यात पिस्तुल नाचवत मयत गुंड ‘भावेश’च्या बिर्थडेचं ‘सेलिब्रेशन’