नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील अर्थसंकल्पात सरकारने करांच्या नियमात केलेल्या बदलांनुसार सरकारने नवीन कलम 80 टीटीबी (कलम 80 टीटीबी) समाविष्ट केले आहे. या कलमानुसार वयोवृद्धांना ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावरील करामध्ये सूट मिळणार आहे. याचा अर्थ असा की, एफडी, रिकरिंग डिपॉजिट किंवा बचत खात्यातून जर कोणते व्याज मिळत असेल तर ५०,००० रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
जर का एखाद्या ज्येष्ठ नागरीकाने 80 टीटीबी अंतर्गत कर सवलतीचा फायदा घेतला तर 80 टीटीए अंतर्गत त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. 80 टीटीबी चा फायदा केवळ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असून इतर करदात्यांना किंवा एचयूएफला याअंतर्गत कोणतीही सूट मिळणार नाही. सामान्य स्तरावर 80TTA अंतर्गत कोणत्याही करदात्यांना १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कर सूट मिळू शकते.
80 टीटीए हा सर्व करदात्यांसाठी असून ज्येष्ठ नागरिकांनी 80 टीटीबी निवडल्यास त्यांना 80 टीटीएचा लाभ मिळणार नाही. यामध्ये जास्तीतजास्त १०,००० रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावर कर सूट मिळेल. तसेच पोस्ट ऑफिस आणि बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर सूट मिळू शकते.
80 टीटीबी आणि 80 टीटीए मधील मूलभूत फरक काय आहे? 80 टीटीए – हे सर्व करदात्यांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 80 टीटीबीची निवड केल्यास त्यांना 80 टीटीएचा लाभ मिळणार नाही. यामध्ये तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याज उत्पन्नावरील कर सूटचा लाभ मिळेल. पोस्ट ऑफिस आणि बचत खात्यातून मिळणार्या व्याज उत्पन्नावर सूट मिळू शकेल.