नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi government | केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) आज डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यामध्ये मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुधारणेद्वारे आता बँक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर 5 लाखांचे विमा कवच मिळणार आहे. एखाद्या बँकेला रिझर्व्ह बँकेने (RBI) मोरॅटोरिअममध्ये टाकल्यानंतर 90 दिवसांच्या आत बँकेच्या ठेवीदाराला ही सुविधा मिळणार आहे. याचा थेट फायदा बुडीत किंवा रिझर्व्ह बँकेने व्यवहारांसंदर्भात निर्बंध लादलेल्या बँकांच्या ठेवीदारांना होणार आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत DICGC कायद्यात बदल करण्यास मंजुरीबाबत मोदी सरकारकडून (Modi government) निर्णय घेण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँक (PMC), येस बँक, लक्ष्मी विलास बँक, भुदरगड पतसंस्था यासारख्या अनेक बँका मागील काही वर्षांत बुडाल्या आहेत. या बँकांमध्ये ग्राहकांनी कष्ट करून ठेवलेला पैसाही बुडाला आहे. यावरून आता अशा अडचणीत सापडलेल्या लोकांना मोदी सरकारने एक दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी कॅबिनेटच्या या निर्णयाची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यातील सुधारणेला मंजुरी देण्यात आली आहे.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे. तसेच, या कायद्यामुळे खातेधारकांना संरक्षण मिळणार आहे. या कायद्यामध्ये कॉमर्शियली ऑपरेटेड सर्व बँक येणार आहेत. यात ग्रामीण बँकाही असणार आहेत. महत्वाचे म्हणजे विम्याचा हप्ता हा ग्राहक देणार नसून बँका भरणार आहेत. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी दिली आहे.
या दरम्यान, नव्या नियमामुळे बुडीत अथवा रिझर्व्ह बँकेने व्यवहारांसंदर्भात निर्बंध लादलेल्या बँकांच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनेक कार्यक्रमाला पाचशे- हजार रुपये दिले जात आहेत.
अडीअडचणीला पैसा हवा असल्यास आपलेच पैसे असून देखील ते मिळत नसल्याची अवस्था अनेक खातेधारकांची झाली आहे.
आता यातून खातेधारकांना मुक्ती मिळण्याची एक आशा दिसू लागली आहे.
Web Title : Modi Government | dicgc bill depositors get rs 5 lakh 90 days bank failure narendra modi cabinet approval
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी