नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Modi Government Alert | मोदी सरकारने (Modi Government Alert) लोकांना सावध केले आहे की, कर्जाच्या नावावर फसवणूक (Cheating) करणार्या प्लॅटफॉर्मपासून सावध रहा. गृह मंत्रालयाकडून (Home Ministry) चालवले जात असलेले जागरूकता ट्विटर हँडल सायबर दोस्तकडून याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे (Modi Government Alert).
ट्विटमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, बाजारातील कर्ज देणार्या बनावट अॅप्लीकेशन्सपासून (lending applications) सावध राहा. असे कोणतेही अॅप्लीकेशन पडताळणीशिवाय मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका आणि त्याच्या संबंधीत लिंक उघडू नका. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, अशा सर्व कर्ज देणार्या कंपन्यांबाबत रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर पडताळणी केली पाहिजे.
RBIच्या वेबसाइटवर सर्व कंपन्यांची माहिती असते. अशावेळी आवश्यक आहे की, कर्जासंबंधी कोणतेही कागदपत्र जमा करण्यापूर्वी पडताळणी करा. भोळ्या ग्राहकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून फसवण्याचा (Fraud Case) प्रयत्न केला जातो. (Modi Government Alert).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कमी सिबिल स्कोअर (Low SibIl score) आणि स्वस्त व्याजदराचे अमिष
देशात अशी फसवणूक करणार्या अनेक संस्था आहेत. हे लोक कमी सिबिल आणि स्वस्त व्याजदराचे अमिष दाखवून लिंक पाठवतात आणि बनावट वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करण्यास सांगतात. एकदा कागदपत्र अपलोड झाल्यानंतर त्यांचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते.
कर्ज देणारी सुमारे 600 अवैध अॅप (600 illegal lenders)
सरकारने याच आठवड्यात सोमवारी संसदेत सांगितले की, सध्या देशात 600च्या जवळपास अवैध कर्ज देणारी अॅप चालवली जात आहेत.
सरकारचा हा आकडा रिझर्व्ह बँकेच्या रिपोर्टवर आधारित आहे.
रिझर्व्ह बँकेने अगोदर सुद्धा अनेक कर्ज देणार्या अॅप्लीकेशन्सची नावे सार्वजनिक केली होती ज्यांच्यावर ग्राहकांची फसवणुकीचा आरोप आहे.
Web Title :- Modi Government Alert | modi government alert do not install fake lending apps or open links related to them all the earnings will disappear in a jiffy.
Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…