वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकन औषध कंपनी मॉडर्ना इंकने म्हटले आहे की, त्यांची प्रयोगांतर्गत वॅक्सीन कोविड – 19 च्या प्रतिबंधात 94.5 टक्के प्रभावी आढळली आहे. हा आकडा वॅक्सीनच्या अंतिम टप्प्यातील ट्रायलमधून मिळालेल्या अंतरिम डाटाच्या आधारावर दिला आहे. कंपनीने म्हटले की, वॅक्सीनचे आतापर्यंतचे ट्रायलचे परिणाम उत्साहजनक आहेत.
मॉडर्नाने म्हटले की, जारी अभ्यासाच्या प्रारंभिक आकड्यांनुसार, त्यांची कोरोना प्रतिबंधक वॅक्सीन 94.5 टक्के प्रभावी दिसत आहे. एक आठवड्यापूर्वी प्रतिस्पर्धी कंपनी फायजर इंकने सुद्धा आपली वॅक्सीन अशाच प्रकारे प्रभावी असल्याची घोषणा केली होती.
Moderna Inc says its experimental vaccine is 94.5% effective in preventing #COVID19 based on interim data from a late-stage clinical trial: Reuters pic.twitter.com/UBU6v5p6Ou
— ANI (@ANI) November 16, 2020
मॉडर्नाचे अध्यक्ष डॉक्टर स्टीफन होज यांनी याचे स्वागत केले आणि म्हटले की दोन विविध कंपन्यांचे समान परिणाम खुप आश्वस्त करणारे आहेत. त्यांनी म्हटले की, यातून आपल्याला अपेक्षा केली पाहिजे की, वास्तवात एक वॅक्सीन या महामारीला रोखण्यासाठी यशस्वी होत आहे.
वॅक्सीनचा परिणाम दिसण्यास लागेल वेळ
पुढील वर्षाच्या सुरूवातीमध्ये कोरोनाची एखादी वॅक्सीन बाजारात उपलब्ध होईल. परंतु, या दरम्यान वॅक्सीन बनवत असलेली फार्मा कंपनी फायजरच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, जरी वॅक्सीन तयार झाली तरी तिला आपला परिणाम दाखवण्यास उशीर लागेल. मात्र, ताबडतोब संसर्गाच्या प्रकरणात घट येणार नाही.